मध्यरात्री ध्वजारोहण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जपली ठाण्यातील 40 वर्षांपूर्वीची परंपरा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण केले. मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा ही शिवसेनेचे स्वर्गीय नेते आनंद दिघे यांनी ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना सुरू केली होती.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण केले. मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा ही शिवसेनेचे स्वर्गीय नेते आनंद दिघे यांनी ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना सुरू केली होती. एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री केलेल्या या ध्वजारोहणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (hoisting the flag at midnight Chief Minister Eknath Shinde preserved the tradition of 40 years ago in Thane)

ठाण्याच्या शिवसेना शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री 12 वाजता ध्वजारोहण केले. त्यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती. हीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला. त्यावेळी आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, असे शिंदे यांनी म्हटले.

“भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. त्यांना अभिवादन करतो. ठाण्यात आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला”, असेही ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

या ध्वजारोहणासाठी उद्धव गटात असलेले शिवसेना नेते राजन विचारेही उपस्थित होते. त्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, “पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचे आहे, त्यांना येऊ द्या असे सांगितले होते”, असे शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण उद्धव ठाकरे गटात असलेल्या राजन विचारे यांनी पोलिसांनी नोटीस देऊन देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी शिंदे गटातील मंत्र्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. तसेच, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – ‘स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून….’ भाषणात मोदींचे मोठे विधान