Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रHoli and Ramadan : कोणी रंग फेकल्यास भांडू नका, अबू आझमींचे मुस्लिम बांधवांना आवाहन, हिंदूंनाही सल्ला

Holi and Ramadan : कोणी रंग फेकल्यास भांडू नका, अबू आझमींचे मुस्लिम बांधवांना आवाहन, हिंदूंनाही सल्ला

Subscribe

भारतात प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजांचे पालन करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना आवाहन करत आहोत की असे काहीही करू नका ज्यामुळे इतरांना त्रास होईल

मुंबई : मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणारी टिप्पणी केल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेतून अलिकडेच निलंबित झालेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी होळी आणि रमझान महिन्यातील शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केले आहे. रमझानच्या काळात होळी असल्याने मुस्लिम बांधवांना जरी रंग उडाला तरी त्यांनी कोणाशीही भांडू नये; कारण हा क्षमा आणि बंधुत्वाचा महिना आहे. (Holi and Ramadan: Abu Azmi’s appeal to Muslims as well as Hindus)

होळीच्या आधी मशिदींना ताडपत्रीने झाकण्याबाबत आमदार अबू आझमी म्हणाले, मशिदी झाकल्या पाहिजेत जेणेकरून कोणीही त्यांच्यावर रंग फेकू नये, ज्यामुळे वाद निर्माण होईल. तथपि, उत्सवांचे राजकारण करण्याची गरज नाही, उलट सर्व लोकांनी एकत्र येऊन आपापले सण साजरे करावेत. आतापर्यंत असेच सुरू आहे. आपल्या देशात गंगा-जमुनी तहजीब आहे. तरीही काही लोक खोडसाळपणा करत असतात. परंतु शुक्रवारी होळी साजरी करणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की, त्यांनी उत्साहाने होळी साजरी करावी, पण त्याचबरोबर कोणत्याही मुस्लिम व्यक्तीवर संमतीशिवाय रंग टाकू नये. नाइलाजाने घरी नमाज पठण करता येते. परंतु, मशिदीत ‘जुम्मे की नमाज’ (शुक्रवारची) आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

जर कोणी तुमच्यावर रंग फेकला तर भांडू नका, अशी मी माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती करेन. कारण हा क्षमा करण्याचा महिना आहे, बंधुत्वाचा महिना आहे, असे सांगताना, आझमी यांनी हिंदूंनाही विनंती केली आहे की, त्यांनी हा सण आनंदाने साजरा करावा; पण जाणूनबुजून कोणत्याही मुस्लिमांवर रंग टाकू नये.

शक्रवारी, 14 मार्च रोजी रमझान आणि होळी देखील आहे. जे वर्षभर नमाज अदा करत नाहीत, ते रमझानमध्ये मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जातात. त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत नमाज अदा केली पाहिजे. या देशात प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजांचे पालन करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना आवाहन करत आहोत की असे काहीही करू नका ज्यामुळे इतरांना त्रास होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Tamil Vs Hindi : भाषिक वाद नव्या वळणार, तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्हच हटविले!