घरताज्या घडामोडीचंद्रपुरात होळीला गालबोट; तिघांचा मृत्यू

चंद्रपुरात होळीला गालबोट; तिघांचा मृत्यू

Subscribe

चंद्रपुरमध्ये होळीला गालबोट लागले असून विविध ठिकाणी दिवसभरात वेगवेगळ्या घटनेमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राज्यभरात रंगाची उधळण करत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आले. परंतु, चंद्रपुरमध्ये होळीला गालबोट लागले आहे. विविध ठिकाणी दिवसभरात वेगवेगळ्या घटनेमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

चंद्रपूरमधील मारडा इथे वर्धा नदीवर चार ते पाच तरुण धुलीवंदन साजरी करण्यासाठी गेले होते. धुलीवंदन साजरी केल्यानंतर ते आंघोळीसाठी नदीत उतरले होते. परंतु, यांच्यामधील अंकित पिंपळशेंडे (२३) हा तरुण आंघोळ करत होता. मात्र, त्याला नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि अंकित पाण्यात बुडाला. ही घटना इतर मित्रांना कळताच त्यांनी आरडाओरड करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. त्यानंतर या घटनेची माहिती नातेवाईक आणि पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अंकितचा सध्या शोध सुरु आहे.

- Advertisement -

११ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

तर दुसरी घटना चंद्रपूर येथील गोंडपीपरी तालुक्यातल्या नांदगाव फुर्डी इथे घडली आहे. मुरुमाचे खड्ड्यात आंघोळीसाटी गेलेल्या संस्कारचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. संस्कार मोगरे (११) याने सकाळपासून आनंदात धुलीवंदन साजरी केली. रंग लावल्यावर आंघोळ करायची कुठे यावर गावलगतचा खड्डा हा पर्याय सर्व मुलांनी निवडला. त्यानंतर ते या खड्ड्यात आंघोळीसाठी गेले. आंघोळ झाल्यानंतर बाकीची मुल वर आली मात्र, संस्कार आला नाही. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. परंतु, तो बाहेर न आल्याने अखेर मुलांनी ही घटना गावात जाऊन सांगितली. त्यानंतर गोंडपीपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संस्कारचा मृतदेह बाहेर काढला.

तर तिसरी घटना पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथे घडली आहे. यामध्ये अखिल कामीडवार (२७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अखिल धुळवड साजरी करुन काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उकाई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोट बुडून ३ जणांचा मृत्यू; ४ बेपत्ता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -