नवी मुंबई, पालघर, रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर; ठाण्यातही 14, 15 जुलैला शाळा बंद

आता मुंबई विद्यापीठानेही १४ जुलै रोजी घेण्यात येणार्‍या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकचर जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे

मुंबई : रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने नवी मुंबई, पालघर, रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचपाठोपाठ आता मुंबई विद्यापीठानेही १४ जुलै रोजी घेण्यात येणार्‍या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकचर जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून कोकणात सतत अतिवृष्टी होत आहे. त्यातच १४ जुलैला कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट तर मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाणे वगळता रायगड व पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाचा आवाका हा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे १४ जुलैला देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने १४ जुलैला घेण्यात येणार्‍या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाकडून १४ जुलैला मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा 14 व 15 जुलै रोजी बंद राहणार

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये याकरिता ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या (प्री स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना गुरुवार १४ जुलै २०२२ ते शुक्रवार १५ जुलै २०२२ पर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे. त्याअर्थी मी राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे शाळांना सुट्टी जाहीर करत आहे, असंही राजेश नार्वेकरांनी सांगितलंय. सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे गरजेचे आहे.


हेही वाचाः दीपक केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका, नाही तर…; राणेंच्या धमकीनंतर युतीत पडणार वादाची ठिणगी