घरमहाराष्ट्रनाशिकशाळांची सुट्टी २ मेपासून तर नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून

शाळांची सुट्टी २ मेपासून तर नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून

Subscribe

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची उन्हाळी सुट्टी २ मे पासून तसेच नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात असा शासन निर्णय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची उन्हाळी सुट्टी २ मे पासून तसेच नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात असा शासन निर्णय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच जूनमध्ये विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा या २७ जून २०२२ पासून सुरु करता येणार आहेत.

शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे काही दिवसांपूर्वी सुट्ट्या आणि शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळून विभागाकडून सदर निर्णय जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन शिक्षणाधिकार्यांच्या परवानगीने करण्यात यावे मात्र माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी असेही शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -