घरताज्या घडामोडीबंडखोर आमदारांच्या मतदार संघात गृह खात्याकडून हायअलर्ट जारी

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात गृह खात्याकडून हायअलर्ट जारी

Subscribe

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. परंतु राज्यात सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि आक्रमकपणा दिसून येत आहे. या बंडखोर आमदारांविरोधात आणि भाजपविरोधात शिवसैनिकांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच काही नेत्यांची पुतळे देखील जाळण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांच्या मतदार संघात गृह खात्याकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह खात्याने महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात टविट देखील केलं आहे. मुंबई आणि एमएमआरडीए भागात विशेष सूचना देण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत. बंडखोर आमदारांबाबत आणखी नाराजी वाढण्याची शक्यता असल्याचं लक्षात घेत गृह खात्याकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्यात एखादा प्रसंग उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज असल्याची माहिती गृहखात्याने ट्विटरवरून दिली आहे. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेच्या १५ आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिंदे गटातील आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. तसेच आमदारांच्या घराबाहेर सुद्धा निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर केंद्राकडून आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था हटवली असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची सुरक्षा काढून घेतली नाही असे सांगितले आहे. यानंतर आमदारांच्या घराबाहेर आता केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा : बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.., शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -