घरमहाराष्ट्रराज्यात २६ जानेवारीपासून सुरु होणार ‘कारागृह पर्यटन’

राज्यात २६ जानेवारीपासून सुरु होणार ‘कारागृह पर्यटन’

Subscribe

२६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन

महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळापासून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले कारागृहे आता पर्यटकांनाही पाहता येणार आहेत. येत्या २६ जानेवारीपासून पुण्यातील ‘येरवडा कारागृह’ पर्यटनासाठी खुले होणार आहे. यासाठी कारागृहांमध्ये प्रिझन टुरिझमची संकल्पना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्धाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.  स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्रातील येरवडा कारागृह अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षी आहे. त्यामुळेच कारागृह पर्यटनाची सुरुवात पुण्यातील ऐतिहासिक येरवडा जेलपासून होणार असून टप्प्यापटप्याने इतर कारागृह पर्यटनासाठी सुरु होतील. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना येरवडा, ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी कैदी ठेवले होते. यामध्ये लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु सरदरा वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्य सैनिकांना येरवडा कारागृहात कैदी केले होते. त्यामुळे या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतरही येरवडा कारागृह अनेक घटनांमुळे चर्चेत आले ते म्हणजे १९९२ च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी अभिनेता संजय दत्त यालाही या कारागृहात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबईवर बॉम्बहल्ल्यातील पाकिस्तानी आरोपी अजमल कसाबलाही याच कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यासाठी पर्यकाटांना हे कारागहृह जवळून पाहता येणार आहेत.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक संस्था तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक यठिकाणे पाहता यावीत या दृष्टीने गृह विभाग याद्वारे प्रथमच ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन मार्गदर्शक पुरविला जाईल. दररोज ५० पर्यटकांना भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच राज्यातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -