घरताज्या घडामोडीकेंद्राच्या निर्णयाचा निषेध; NIA कडे तपास सोपवणे घटनाबाह्य - अनिल देशमुख

केंद्राच्या निर्णयाचा निषेध; NIA कडे तपास सोपवणे घटनाबाह्य – अनिल देशमुख

Subscribe

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिल्यानंतर आता राज्य सरकारनेही यावर टीका केली आहे. “भीमा कोरेगाव प्रकरणाचा राज्य सरकार योग्य दिशेने तपास करत होते. मात्र काल केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात न घेता या प्रकरणाचा तपास NIA कडे दिला. ही कृती घटनाबाह्य असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी आज सकाळी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, केंद्र सरकारला या प्रकरणात कुणालातरी वाचवायचे असल्यामुळेच त्यांनी हा तपास एनआयएकडे दिला असावा. एल्गार परिषद प्रकरणात काही चुकीच्या लोकांना गुन्हेगार ठरविले आहे का? याचा तपास आम्ही करत होतो. मात्र केंद्र सरकारने हा तपास काढण्याबाबत आम्हाला शंका आहे. विधी व न्याय खात्याकडून कायदेशीर सल्ला घेऊन राज्य सरकार पुढील कार्यवाही करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मतांचे राजकारण करण्यासाठी काही लोक पोलिसांचे खच्चीकरण करत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तापस दिल्याबद्दल मी समाधानी आहे. नक्षलवाद्यांचे जाळे देशभर पसरलेले आहे. तसेच आम्ही ज्यांच्यावर आरोप निश्चित केले होते. त्यांच्यावर आघाडी सरकारने देखील आरोप ठेवले होते, त्यामुळे राज्य सरकारचे हे दुटप्पी धोरण आहे. – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

हे वाचा – शरद पवारांच्या पत्रानंतर भीमा-कोरेगाव प्रकरणाची पुन्हा चौकशी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -