घरमहाराष्ट्रगृहमंत्री अनिल देशमुखांकडून जळगाव पोलिसांना क्लीन चिट

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून जळगाव पोलिसांना क्लीन चिट

Subscribe

जळगाव महिला वसतिगृह प्रकरण

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा बुधवारी चांगलाच गाजला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकार्‍यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचे वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचे सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.

वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकार्‍यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले, महिलांशी चर्चा केली. महिलांचे वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडिओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकार्‍यांनी दिला असून तो मी पटलावर ठेवतो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, १७ महिलांना कविता म्हणण्याचे, गाणी गाण्याचे बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या.

नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षांखालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का? अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी हे वृत्त चुकीचे असून हे मुलींचे नाही तर महिलांचे वसतिगृह असल्याची माहिती दिली. तसेच ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -