Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लॉकडाऊनबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

लॉकडाऊनबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

Related Story

- Advertisement -

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू केल्याने आता राज्यात देखील लॉकडाऊन लागू होणार अशी खोटी माहिती सोशल मिडीयावर पसरवली जात आहे. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोटी माहिती पसरविण्यांना इशारा दिला आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधित केलं. यावेळी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? असा प्रश्न केला. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाला रोखण्यासाठी सूक्ष्मस्तरीय नियोजन; होम क्वारंटाईन रुग्णांवर करडी नजर ठेवा


 

- Advertisement -