घरताज्या घडामोडीहोम मिनिस्टरनेच घेतला घरच्या किचनचा कंट्रोल

होम मिनिस्टरनेच घेतला घरच्या किचनचा कंट्रोल

Subscribe

किचनमधूनच सुरू केली करोना विरोधातली लढाई

देशात करोनाविरोधी प्रतिबंध करण्यासाठी देशात आणि राज्यात युद्ध पातळीवर जरी प्रयत्न सुरू असले तरी खरी लढाई ही आता घरी बसून करण्याची आहे. खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनीही ही लढाई आता घरा बसूनच सुरू केली आहे. करोना विरोधातील युद्धात घरी बसणं हाच लढाऊ सैनिकाचा धर्म आहे. मी लढतोय तुम्ही सुद्धा लढणार ना ? अस म्हणत आता गृहमंत्र्यांनी आपला मोर्चा किचनकडे वळवला आहे. जनता कर्फ्युच्या निमित्ताने गृहमंत्र्यांनीच किचनचा ताबा घेत आता घरातूनच सैनिकाचा धर्म पाळायला सुरूवात केली. आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी स्वयंपाक करताना सून आणि मुलीची मदत मिळवता त्यांनी किचनमधील मोहीम फत्ते केली. जनतेला आवाहन करतानाच आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच वर्क फ्रॉम होमची खऱ्या अर्थाने सुरूवात केली आहे.

- Advertisement -

हातात चमचे, फोडणीसाठीची तयारी, कापलेल्या भाज्या आणि एक खमंग कुर्मा भाजीच्या तयारीत गृहमंत्री व्यस्त आहेत. एखाद्या सैनिकाचा जसा पोशाख असतो, तसाच किचनसाठीचा पोशाख चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एप्रॉन वापरल्याचे पहायला मिळत आहे. मन लावून फाजीला फोडणी देण्यापासून ते भाजीला तिखट मीठ व्यवस्थित राहील याची जबाबदारी देशमुख यांनी घेतली. त्यांच्या मदतीला सून राहतने तर मुलगी पूजानेही हातभार लावला. आजच्या जनता कर्फ्युत घरी राहूनच स्वयंपाक करण्याचा देशमुख यांनी बेत केला आहे. हा सगळा घटनाक्रम अनिल देशमुख यांनी ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. एक ट्विट करून गृहमंत्री स्वयंपाक घरात कसे एक्टीव्ह आहेत याचाही एक उत्तम आदर्श जनता कर्फ्युच्या निमित्ताने गृहमंत्र्यांनी घालून दिला आहे.

काय म्हणाले गृहमंत्री ?

आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी स्वयंपाक करताना सून राहत व मुलगी पुजाची मदत मिळाली. आपणही घरी राहून देश सहकार्य करावे, ही विनंती. करोना विरोधातील युद्धात घरी बसणं हाच लढाऊ सैनिकाचा धर्म आहे. मी लढतोय, तुम्हीसुद्धा लढणार ना ?
#WorkFromHome #WarAgainstVirus

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -