राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ५२०० पद भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ५२०० पद भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

police personanel above age of 55 years age will work from home due to covid omicron says dilip walse patil
५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्र्यांचे आदेश

राज्यातील पोलीस दलात ३१ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये ५२०० पद भरणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. पोलीस दलात प्रलंबित असलेल्या भरतीबाबत गृहमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सध्या राज्याच्या पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांवर भरती करण्यात येणार आहे. परंतु प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात ५ हजार २०० पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच पोलीस दलातील मृत पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याबाबतही गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी वळसे पाटील यांनी राज्यातील प्रलंबित ५ हजार २०० पदांवर पहिल्या टप्प्यात भरती करण्यात येणार असल्याचे सांगतिले आहे. ही भरती ३१ डिसेंबरपुर्वी करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७ हजार पदांची भरती दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक पार पडली या बैठकीत कायदा सुव्यवस्था परिस्थिती, गुन्हे दाखल आणि सिद्ध होण्याचे प्रमाण तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

पोलीस दलाने सर्वसामान्यांना सहकार्य व सौजन्यपूर्ण वर्तणुकीतून आदरपूर्ण सेवा द्यावी, यातून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, महिलांसंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांची तात्काळ दखल घेऊन नोंद आणि तपास करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. औरंगाबाद परिक्षेत्राची हद्द वाढविण्यासंदर्भात ऑरिक सिटी व वाळूज औद्योगिक क्षेत्राचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.