घरमहाराष्ट्रपत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणाची आता SIT चौकशी; गृहमंत्री फडणवीसांचे आदेश

पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणाची आता SIT चौकशी; गृहमंत्री फडणवीसांचे आदेश

Subscribe

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. वारिशे यांच्या मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेत त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची गांर्भीयाने दखल घेत चौकशीची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून केली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (विशेष शोधपथक) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी लवकरात लवकर एसआयटी स्थापन करुन तपास करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाना दिले आहेत. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या गाडीला सोमवारी एका धरधाव गाडीने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याचा गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीसंदर्भात वारिशे यांनी बातमी दिली होती. ही बातमी एकप्रकारे नाणार रिफायनरीला प्रकल्पाला एकप्रकारे विरोध करणारी होती त्यामुळेचं वारिशे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप नाणार विरोधी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी संबंधीत गाडीचे चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत म्हणाले की, रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपाचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवणचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. तसेच हा गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेरकरने आखलं, असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे.


महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -