घरमहाराष्ट्र'फुकट बिर्याणी' ऑडिओ क्लीपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; दिले चौकशीचे आदेश

‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लीपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; दिले चौकशीचे आदेश

Subscribe

अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल - दिलीप वळसे-पाटील

पुण्यातील एसपी हॉटेलची फुकट बिर्याणीची फर्माईश करणाऱ्या पोलीस उपायुक्तांची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. मात्र, आता या ऑडिओ क्लीपची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

पोलीस उपायुक्त महिलेने पोलीस कर्मचाऱ्याकडे केलेल्या बिर्याणीच्या फर्माईशीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मी ऑडिओ क्लीप ऐकली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

काय आहे ऑडिओ क्लिप?

जवळपास पाच मिनिटांची ही ऑडिओ क्लीप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज डीशची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय.

सत्य बाहेर येईलच -प्रियंका नारनवरे

माझी अजून चौकशी झालेली नाही. गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे ते बाहेर येईल. तसेच मी स्वत:ही तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळे कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोक होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केले गेले आहे. गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल. माझ्या कार्यालयात काही कर्मचारी होते. त्यांना काढण्यासाठी मी पाऊल टाकले होते. त्यांचे भरपूर हितसंबंध होते, या गोष्टीमुळे वातावरण खराब होत होते. म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनला परत पाठवले. हे लोक दुखावलेले आहेत. काही सीनिअर्सचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे केले गेलेले आहे. हा एकप्रकारे मला गुंतवण्याचा प्रकार आहे, असे स्पष्टीकरण डीसीपी प्रियंका नारनवरे यांनी दिले आहे.

- Advertisement -

DCP मॅडमची फर्माईश सोशल मीडियावर व्हायरल|Pune DCP wants free biryani

पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलमधील साजूप तुपातील बिर्याणी हवी आहे. पण, तीही फुकटात. डीसीपी मॅडमची ही फर्माईश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिर्याणीसोबत अजून काय काय हवं? ऐका डीसीपी मॅडमचे संभाषण.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, 30 July 2021

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -