NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांचे स्पष्टीकरण

HOME minister dilip walse patil reaction mumbai police not followed sameer wankhede
NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांचे स्पष्टीकरण

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलीस पाळत ठेवल्याची तक्रार करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी डीजीपींकडे तक्रार केली आहे. परंतु वानखेडेंवर मुंबई पोलीस पाळत ठेवून नसल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या नसल्याचेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यावर दोन पोलीस कर्मचारी पाळत ठेवून असल्याची तक्रार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केली आहे. राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची, कमिश्नर, अधिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एनसीबी अधिकीर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. समीर वानखेडेंनी डीजीपींकडे पोलीस पाळत ठेवून असल्याची तक्रार केली आहे. परंतु गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाळत ठेवण्यात आली नसून तशा सूचनाही मुंबई पोलिसांना दिल्या नसल्याचे सांगितले आहे.

महिला सुरक्षा, गुन्हेगारी संदर्भात बैठक

राज्यात वाढणारी गुन्हेगारी, महिला अत्याचारांचे वाढते प्रमाण यावर चर्चा आणि ठोस निर्णय घेण्यासाठी तसेच सूचना करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिक्षकांना, कमिश्नर आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी २ वाजता सुरु होऊन ५ वाजेपर्यंत चालेल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत पोलीस दलाचा अधिक चांगला कारभार कसा करता येईल याच्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

कुंटे, जैस्वाल यांना साक्ष देण्यासाठी समन्स

रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीमध्ये सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई मुंबईच्या सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही समन्स बजावण्यात आलं आहे. यावर गृहमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जैस्वाल यांनी सीबीआय प्रमुख म्हणून समन्स बजावण्यात आलं नाही तर फोन टॅपींग प्रकरणावेळी ते राज्याचे डीजीपी होते यामुळे त्यांचा बैठकीत सहभाग होता. याबाबत ते साक्ष आहेत त्यामुळे त्यांना समन्स पाठवण्यात आले असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर पोलिसांची पाळत, वानखेडेंची DGPकडे तक्रार