Kirit Somaiya कारवाईत CMOचा संबंध नाही, गृहमंत्रालयाचाच निर्णय – दिलीप वळसे पाटील

home minister dilip walse patil reaction on kirit somaiya police action
Kirit Somaiya कारवाईत CMOचा संबंध नाही, गृहमंत्रालयाचाच निर्णय - दिलीप वळसे पाटील

भाजपचे नेते किरीट सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याचा पाठपुरवा करण्यासाठी आणि घोटाळ्यांबाबत तक्रार, कारखान्यांना भेट देण्यासाठी कोल्हापूर दौरा करणार होते. मात्र त्यांना कोल्हापुरमध्ये पोहोचण्यापूर्वी आज पहाटे साडे चार वाजता कराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना जिल्हाबंदीची नोटीस दिली आणि जिल्ह्यात न येता कराडमध्ये थांबण्याची विनंती केली. त्यानुसार सोमय्यांनी विनंती स्वीकारून शासकीय विश्रामगृहात थांबले. पण सध्या सोमय्यांवरील होणाऱ्या कारवाईबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाने एकत्रितपणे कारवाई केल्याचे मत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मांडले आहे. मात्र आता स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली? याबाबत स्पष्ट केले आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘सामान्यतः जेव्हा अशा प्रकारची घटना घडते तेव्हा वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना माहिती देतात आणि मुख्यमंत्र्यांना देखील माहिती दिली जाते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की नाही हे माहित नाही. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाचा याच्यासंबंध नाही आहे. या संदर्भात जो काही निर्णय आहे, तो गृहमंत्र्यालयाने घेतला. ही वस्तुस्थिती आहे.’

दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफ यांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा उघड केला. यासंदर्भातील पुरावे उद्या, मंगळवारी ईडी आणि आयकर विभागाला देणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.


हेही वाचा – Kirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते? वाचा सविस्तर