शरद पवार राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक आहेत का?, गृहमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

eknath shinde letter mla security dilip walse patil reply cm uddhav thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना राष्ट्रपती पदाची जबाबदारी देऊन त्यांना ती कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळावरी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारसाठी राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वळसे पाटील यांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले.

मागील दोन दिवसात देशातील काही वेबसाईट हॅक झाल्या आहेत हे सत्य आहे. या संदर्भात सायबर सेलचे प्रमुख मधुकर पांडे माहिती घेत आहेत. ठाण्याची वेबसाईटही हॅक झाली आहे, परंतु महत्त्वाचा डेटा गेला नाही. समाजात जी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हॅकर्सने जगातील सर्व हॅकर्सना तुम्ही यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे. वेबसाईट हॅक करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. याबाबत राज्य सरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात यंत्रणा माहिती घेत आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

आपल्या देशात समाजासमाजामध्ये विद्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. त्याला प्रतिकार म्हणून, प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती काही समाजातील टोकाचा विचार करणार्‍या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही. शेवटी सगळ्यांना सलोख्याने रहायचे असेल तर एकमेकांच्या अडचणी आणि भावना समजून घेणे गरजेचे आहे.जे आवाहन केले जात आहे त्यामध्ये नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य करण्यात आले, त्यासंदर्भात देशाच्या प्रमुखाने माफी मागावी ही मागणी आहे. मात्र पक्षाच्या प्रवक्त्याने जे उद्गार काढले त्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कारवाई सुरू आहे. आता याबाबत काय निर्णय घ्यायचा हे देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः ठरवावे, असे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले.


हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर