Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नितेश राणेंविरोधात लुक आऊट नोटीस, गृहमंत्री म्हणतात हा पोलीस...

नितेश राणेंविरोधात लुक आऊट नोटीस, गृहमंत्री म्हणतात हा पोलीस…

केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत तक्रार गेली असणार त्यांनी राज्य सरकारला पाठवली

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, एखादे प्रकरण कोणाकडे सोपवायचे याचा अधिकार पोलीस महासंचालकांचा आहे. यामुळे त्यांनी त्या प्रमाणे हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवलं असेल. कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोपाखाली क्राईम ब्रांचने लुक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे. मात्र मुंबईतील ब्रांचमध्ये खातं असताना पुणे पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर कसं काय काढलं असा प्रश्न नितेश राणे यांनी केला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्री दिलीस वळसे पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे की, डीएचएफएल कर्ज प्रकरणात नीलम राणे आणि आमदार नितेश राणेंच्या विरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या संदर्भात केंद्राकडून एक पत्र राज्य सरकारला प्राप्त झालं असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृह विभागाला गृह विभागाच्या मार्फत पत्र पाठवलं होते कदाचित त्यावर कारवाई झाली असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत तक्रार गेली असणार त्यांनी राज्य सरकारला पाठवली, राज्य सरकाकडून पोलीस विभागाला पाठवली त्यावर हा निर्णय घेतला असावा. एखादे प्रकरण कोणाकडे सोपवायचे याचा अधिकार पोलीस महासंचालकांचा आहे. त्याप्रमाणे हे प्रकरण महासंचालकांनी पुणे पोलिसांकडे सोपवलं असावं असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

पुणे क्राईम ब्रांचने काढलेल्या लूक आऊट नोटीसवर आमदार नितेश राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, लुक आऊट सर्क्युलर म्हणजे त्यांनी एयरपोर्ट अथॉरिटीला इंटिमेट केलं आहे की, नितेश राणे आणि नीलम राणे देश सोडू शकतात हा पहिला मुद्दा आहे. तर दुसरा मुद्दा असा आहे की, हे जे काही सर्क्युलर काढलं आहे ते पुणे क्राईम ब्रांचने काढला आहे. आमचे डीएचएफलचे खातं हे मुंबई ब्रांचमध्ये आहे. पुणे क्राईम ब्रांचने कोणत्या हिशोबाने अधिकार राहतो. ५ महिन्यांपुर्वी आम्ही अधिकृत बँकेला पत्र लिहून आम्हाला लोन सेटल करायचे आहे असे सांगितले आहे. तर मग हे अशा पद्धतीचे पत्र पाठवून उपयोग नाही. या प्रकरणावर आम्ही हायकोर्टात आव्हान देणार असून स्क्वॉश करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार, लूक आऊट सर्क्युलरवरुन नितेश राणेंचा इशारा


- Advertisement -

 

- Advertisement -