घरCORONA UPDATEअमिताभ यांना केंद्र सरकारने बडतर्फ करावं - अनिल देशमुख

अमिताभ यांना केंद्र सरकारने बडतर्फ करावं – अनिल देशमुख

Subscribe

येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेल्या वाधवान बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि इतर अशा एकूण २३ जणांना लॉकडाऊन लागू असूनही खंडाळ्याहून थेट महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देणारं पत्र देणारे गृहविभागातील प्रधान सचिव आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांना बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता विरोधकांनी करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. मात्र, आता त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘किरीट सोमय्या हे उपद्रवी नेते आहेत’, असा खोचक टोला देखील देशमुख यांनी लगावला आहे.

काय म्हणाले गृहमंत्री?

‘वाधवान बंधूंसह २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर
पाठवण्यात आलं असून त्यांच्यावरची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते रजेवरच राहतील. पण भाजपचे नेते किरीट सोमय्या हे उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याच्या बडतर्फीचे अधिकार केंद्र सरकारला असतात. त्यामुळे किरीट सोमय्या आणि भाजपच्या अन्य नेत्यांना विनंती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून अमिताभ गुप्ता यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी’, अशी टिप्पणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

- Advertisement -

रोहीत पवार म्हणतात, ‘निरमा पावडरने धुणार नाही’

दरम्यान, भाजपने या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीच्या विरोधात मोहीम उघडल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील त्याला प्रतिक्रिया दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘आज सर्वजण रात्रंदिवस काम करत आहेत. एखाद्या अदिकाऱ्याने व्यक्तिगत पत्र देऊन चूक केली तर महाविकासआघाडीमार्फत कोणतीही क्लीनचिट न देता किंवा निरमा पावडरने चुका धुवून न काढता संबंधितांवर कारवाई होते. तरीही याचा दोष संपूर्ण यंत्रणेला देण्याचा प्रयत्न केला जातो’, असं ट्वीट रोहीत पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

राज्यभरात लॉकडाऊन असताना जिथे सामान्य नागरिकांना घरातच राहण्यास बजावण्यात येत आहे, तिथे वाधवान सारख्या बड्या धेंडांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला त्यांच्या फार्महाऊसवर जाण्याची परवानगी देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी स्वत:च्या शिफारस पत्रावर ही परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राजीनामा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

वाधवान प्रकरणातला बोलवता धनी समोर आला पाहीजे | Devendra fadnavis slams home minister Anil Deshmukh

वाधवान प्रकरणातला बोलवता धनी समोर आला पाहीजे | Devendra fadnavis slams home minister Anil Deshmukh

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 10, 2020


वाचा सविस्तर – घोटाळेबाज वाधवान कुटुंबीय प्रधान सचिवांच्या पत्राने महाबळेश्वरला, चौकशी सुरू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -