घरताज्या घडामोडीगृहमंत्र्यांनी घेतला नाशिक जिल्ह्याचा आढावा

गृहमंत्र्यांनी घेतला नाशिक जिल्ह्याचा आढावा

Subscribe

मालेगाव पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत बुधवारी (दि.२७) जिल्ह्याचा धावता आढावा घेतला. जळगाव दौर्‍यावर जाण्यापुर्वी ते ओझर टाऊनशिप (ता.निफाड) येथील विश्रामगृहावर आले होते. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथील पॉवरलूम व जिल्ह्यातील कारखाने सुरु करण्याची मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या हजारांवर पोहोचली आहे. ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचार्‍यांसह ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह आमदार दिलीप बनकर उपस्थित जिल्ह्याची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी आमदार बनकर यांनी सायखेडा पोलीस ठाणे मंजूर करण्याबाबत गृहमंत्री यांच्याशी चर्चा केली. करोनाची परिस्थिती संपल्यानंतर सायखेडा पोलीस ठाण्यास मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कामगारांना रोजगार मिळण्यासाठी मालेगावातील पॉवरलुम व जिल्ह्यातील कारखाने सुरु करावेत, अशी मागणी आमदार बनकर यांनी गृहमंत्री पाटील यांच्याकडे केली असता त्याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सुमारे तासभर झालेल्या या चर्चेत करोनाच्या विषयावर गांभायार्र्ने चर्चा करुन जळगावकडे प्रयाण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -