घरमहाराष्ट्रकायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी, अकोल्याच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचे शरसंधान

कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी, अकोल्याच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचे शरसंधान

Subscribe

मुंबई : अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे.

हेही वाचा – अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारेची तीव्र प्रतिक्रिया

- Advertisement -

अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचे उघङ झाले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी गणेश कुमरेला अटक केली आहे. पीडितेचे वडील मोलमजुरी करतात.

- Advertisement -

पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत एकेदिवशी आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने पीडितेवर अत्याचार केला. घाबरलेल्या पीडितेने याची वाच्यता केली नाही आणि याचाच फायदा घेत आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिले. एवढेच नव्हे तर, कात्रीच्या सहाय्याने तिचे केस देखील कापले. दिवसेंदिवस अत्याचार वाढत गेल्याने पीडितेने अखेर या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा – ‘लेडीलक’ का कमाल; कमिन्सआधी धोनी आणि ‘या’ कर्णधारांसोबतही हेच घडलं

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलीची विटंबना करून तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत एका गावगुंडाची मजल जाते, हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून उचित कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -