Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Mhada Lottery 2021 : 10 लाखांमध्ये मुंबईनजीक घर, म्हाडाची कुठे किती घरे...

Mhada Lottery 2021 : 10 लाखांमध्ये मुंबईनजीक घर, म्हाडाची कुठे किती घरे ?

Related Story

- Advertisement -

घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मुंबईनजीक अवघ्या १० लाखांमध्ये घर विकत घेण्याचे स्वप्न पुर्ण करण्यात येणार आहे. मुंबईनजीकच्या ठिकाणासोबतच अतिशय मोक्याच्या ठिकाणी या घरांची उपलब्धतता आहे हे विशेष. अवघ्या १० लाखांपासून या घरांच्या किंमती आहेत.

मुंबईनजीकच ५५७ बिल्ट अप एरिया असणारे घर अवघ्या १५ लाखांमध्ये उपलब्ध आहे. तर ६९८ बिल्टअप एरिया असलेले घर १८.८४ लाखांना उपलब्ध आहे. तर ३७० चौरस फुटांचे घर हे अवघ्या ९.९८ लाखांमध्ये उपलब्ध आहे. ही सगळी घरांची उपलब्धतता ही म्हाडाच्या माध्यमातून होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध होणार आहेत. कोकण मंडळाने यंदा ८९८४ घरे लॉटरीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

कुठे किती किंमतीत घरे ?

- Advertisement -

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे वडवलीत ५५७ चौरस फुटाचे घर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या घराचा कार्पेट एरिया ३७७.६५ फूट इतका आहे. तर ७२२ स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आणि ३९६ स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असणारा फ्लॅट हा १९.५ लाखांना उपलब्ध आहे. ठाण्याच्या कासारवडवली येथे १७ लाख ते १८.८४ लाख इतकी घरे उपलब्ध आहेत. या घरांचा बिल्टअप एरिया ६३० ते ६९८ चौरस फूट आणि कार्पेट एरिया ४०० ते ५१५४ चौरस फूट इतका आहे.

ठाण्याच्या घोडबंदरमध्ये मोघरापाडा ९.९८ लाख किंमतीला घर उपलब्ध आहे. या घराचा कार्पेट एरिया ३०६ फूट आहे. तर बिल्ट अप एरिया ३७० चौरस फूट इतका आहे. या संपुर्ण योजनेअंतर्गतची घरे ही म्हाडाच्या ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. येत्या १४ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील एका ऑडिटोरिअममध्ये या योजनांसाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोकण मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी  अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.

ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या तारखा

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील व अर्ज नोंदणीची सुरवात २४ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट, २०२१ रोजीच दुपारी ३ वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. इच्छूक अर्जदार २२ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ – २३ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबर, २०२१ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.


हेही वाचा – Mhada lottery 2021 : रजिस्ट्रेशन, घरांची उपलब्धतता, पात्रता एका क्लिकवर


 

- Advertisement -