घरट्रेंडिंगकाय सांगताय! 'या' शहरात मिळतं 'हनीमून पान'; सर्वात महाग पानाची किंमत तर...

काय सांगताय! ‘या’ शहरात मिळतं ‘हनीमून पान’; सर्वात महाग पानाची किंमत तर बघा

Subscribe

'हनिमून पॅकेज पाना'ची किंमत ५ हजार रुपये.

‘खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला’. १९७७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘डॉन’ या चित्रपटातील हे गीत.  अभिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्याने भल्याभल्यांना वेड लावल. या गाण्यातून बनारसी पानाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. पण, आज आपण बनारसी पानाबद्दल नाही तर ‘हनीमून पॅकेज पाना’विषयी बोलत आहोत. देशातील औरंगाबाद या शहरात चक्क ‘हनीमून पॅकेज पान’ मिळत. याची किंमत वेगवेगळी असली तरी सर्वात महाग पानाची किंमत ५ हजार आहे. आश्चर्य वाटल ना. पण, हे खर आहे. तर सर्वात स्वस्त पानाची किंमत ७ रुपये इतकी आहे. त्यामुळे सध्या या पानाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

हनीमून पॅकेज पानात ३ व्हरायटी

औरंगाबाद शहरात तारा पान सेंटर आहे. या सेंटरमध्ये पानांच्या ५० व्हरायटी आहेत. तर हनीमून पॅकेजमध्ये तीन प्रकारच्या व्हरायटी आहेत. त्यामध्ये सर्वात महाग पान हे ५ हजार रुपये किंमतीला आहे. तर ‘कोहिनूर मसाला पान’ ३ हजारला आहे. तर ‘कपल पाना’ची किंमत २ हजार रुपये इतकी आहे.

- Advertisement -

सर्वात कमी किंमतीचे पान

तारा पान सेंटरचे मालक मोहम्मद सर्फुद्दीन सिद्दीकी उर्फ सैफू चाचा यांनी सांगितले की, ‘पान किती दिवस टिकते, त्यावर त्याची किंमत ठरते. एखाद्या पानाचा कालावधी जास्त काळ असले तर ते पान महाग विकले जाते’. त्यांनी सांगितले की, ‘सर्वात महाग पान हे ५ हजार रुपये किंमतीचे असून ते तीन दिवसापर्यंत राहते. तर सर्वात स्वस्त पान हे केवळ सात रुपयात मिळते’.

जाणून घ्या हनीमून पॅकेजबाबत

सर्फुद्दीन यांनी सांगितले की, ‘पानाबाबत मला माझ्या आईकडून माहिती मिळाली. तर माझ्या आईला पानाचा फॉर्मूला तिच्या नानांकडून मिळाला. या पानाची खासीयत म्हणजे या पानाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते. एका पॅकेटमध्ये दोन पान असतात. तर हे पान बनवण्यासाठी २५ मिनिटाचा कालावधी लागतो. यामध्ये सोने, चांदीचे वर्क असते. तसेच गुलाब, सुगंधी चटणी, सफेद चटणी, मध इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. यापूर्वी या पानाची किंमत १० हजार रुपये होती. पण, मागणी घटल्यानंतर पानाची किंमतही कमी झाली. तसेच आधी लग्नाच्या वेळी ६ ते ८ पाने विकत घेतली जायची.

कोण आहे सर्फुद्दीन?

औरंगाबादमध्ये राहणारे ७२ वर्षाचे तारा पान सेंटरचे मालक मोहम्मद सर्फुद्दीन सिद्दीकी उर्फ सैफू चाचा यांनी ५२ वर्षांपूर्वी पानाचे दुकान सुरु केले. पण, त्यांना त्यांच्या तारुण्यात बॉलीवूडचे वेगळेच आकर्षण होते. त्यामुळे ते मुंबईला देखील आले होते. मुंबईत येऊन त्यांनी वेटर आणि ज्युनिअर डायलॉग रायटरचीही कामे केली. मात्र, मुंबईत काही टिकाव लागला नाही. मग, ते औरंगाबादमध्ये आले आणि त्यांनी पानाचे दुकान टाकण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – भाजी विकणाऱ्या पठ्याने UPSC परीक्षेत पटकावला ८वा क्रमांक


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -