Eco friendly bappa Competition
घर ठाणे बदलापूरच्या अजिंक्य हायकर्स संस्थेच्या सदस्यांना शिवप्रेमींकडून सन्मानाचा मुजरा

बदलापूरच्या अजिंक्य हायकर्स संस्थेच्या सदस्यांना शिवप्रेमींकडून सन्मानाचा मुजरा

Subscribe

बदलापूरच्या अजिंक्य हायकर्स संस्थेच्या सदस्यांना राज्यभरातील शिवप्रेमींनी सन्मानाचा मुजरा केला आहे. बदलापूरच्या चंदेरी दुर्गावर शिवजयंती दिनी अजिंक्य हायकर्स संस्थेच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मेघडंबरी सहित स्थापना करण्यात आली. अतिशय कठीण असलेल्या दुर्गावर अजिंक्य हायकर्स संस्थेने २९० किलो इतक्या वजनाची मूर्ती स्थापन केली. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील अतिशय कठीण दुर्गावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना केल्याने अजिंक्य हायकर्स संस्थेच्या वचनपूर्ती सन्मान सोहळ्यात सदस्यांना सन्मानाचा मुजरा करण्यात आला.

बदलापूर शहरात ४५ वर्षांपूर्वी अजिंक्य हायकर्स या गिर्यारोहक संस्थेची स्थापना करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील राजू निकम यांनी या संस्थेची स्थापना केली. साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या अजिंक्य तारा या दुर्गाचे नाव त्यांनी या संस्थेला दिले. बदलापूर शहर सुद्धा एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या जाव्यात, त्यांचे जतन व्हावे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.

- Advertisement -

राजू निकम यांच्या निधनानंतर अजिंक्य हायकर्स संस्थेचे सदस्य त्यांचा ऐतिहासिक वारसा उत्कृष्टपणे जपत आहेत. सध्या अजिंक्य हायकर्स संस्थेत ६८ सदस्य कार्यरत आहेत. बदलापूर शहरासह राज्यातील इतर गडदुर्गांचे संवर्धन अजिंक्य हायकर्स संस्थेच्या वतीने केले जाते. काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या वतीने सह्याद्री पर्वत रांगेतील चंदेरी या अवघड दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मेघडंबरी सहित स्थापना करण्यात आली. महाराजांची मूर्ती स्थापन करण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले. अश्या गिर्यारोहकांचा आणि चिंचवली गावातील ग्रामस्थांचा सत्कार अजिंक्य हायकर्स संस्थेच्या वतीने करण्यात आला.

बदलापूर पूर्वेच्या एका सभागृहात हा सोहळा पार पडला. सत्कार समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी अजिंक्य हायकर्स संस्थेला सुचलेली कल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याने, संस्थेच्या सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित शिवप्रेमींनी सन्मानाचा मुजरा केला. यावेळी जेष्ठ इतिहासकार प्र.के. घाणेकर, रायगड स्मारक समितीचे सुधीर थोरात, रुपेश मोरे, दादर शिवाजी मंदिरचे बजरंग चव्हाण, शिवराज्यभिषेक सेवा समितीचे सुनील पवार, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, शरद तेली, यांच्यासह राज्यभरातील शिवप्रेमी उपस्थित होते.


- Advertisement -

हेही वाचा : सर्वसामान्य रुग्णांना महागाईची झळ, १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं


 

- Advertisment -