Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर; जपानमधील विद्यापीठाची घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर; जपानमधील विद्यापीठाची घोषणा

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयसान विद्यापीठानं आज ही घोषणा केली आहे.

टोकियो: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयसान विद्यापीठानं आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार यांसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयासान विद्यापीठाकडून आज ही घोषणा करण्यात आली आहे. (Honorary doctorate announced to Deputy Chief Minister Devendra Fadnavis Announcement of University in Japan)

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरवर्षी जपानमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी होते. महाराष्ट्र सरकारकडून कोयासान विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक लेटर ऑफ अॅप्रिसिएनश देण्यात आलं आहे.

फडणवीसांचा पाच दिवसांचा जपान दौरा

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीस यांचं मराठमोठ्या पद्धतीनं स्वागत केलं आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते दौऱ्यात भेटी घेणार आहेत.

( हेही वाचा: Loksabha 2024 : बुलढाण्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवा; उद्धव ठाकरेंनी दिले शिवसैनिकांना आदेश )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -