घरताज्या घडामोडीनाशिक महानगरात अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त

नाशिक महानगरात अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त

Subscribe

मालेगावात नशेसाठी वापरल्या जाणार्‍या कुत्ता गोळींचा साठा धुळ्याहून विक्रीसाठी घेवून येणार्‍या पुरवठादारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची घटना ताजी असताना नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२) रात्री हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मालकासह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मालक अल्ताफ ईस्माईल सैयद, शाहीद दस्तगीर खानसह १६ जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून सुरू असलेला नशेचे रॅकेट आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

नाशिक महानगरात चोरून लपून हुक्का पार्लर चालू असून तरूण मुले-मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची तक्रारी नाशिक शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरचा शोध सुरू केला. साईनाथ चौफुलीजवळ, अस्सल सातारी मिसळ बिल्डींगच्या तिसर्‍या मजल्यावर अजिज मेन्सन कॅफे आहे. या ठिकाणी अल्ताफ ईस्माईल सैयद व शाहीद दस्तगीर खान हे अजिज मेन्शन कॅफेमध्ये हुक्का पार्लर चालवत आहेत. हुक्कामध्ये निकोटीन व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी (दि.२) रात्री ८.३० वाजेदरम्यान अजिज मेन्शन कॅफेमध्ये छापा टाकला. कॅफेमालकाने विनापरवानगी हुक्का कॅफे सुरू ठेवाला. बंदी असलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व हुक्का पिण्याचे साहित्य सेवनकरीता उपलब्ध करून देताना मिळून आला. पथकाने मालकासह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -