रिक्षा अपघातात ७ जणांचा मृत्यू, मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात

horrific rickshaw accident on Mumbai-Nagpur highway 6 killed
रिक्षा अपघातात ६ जणांचा मृत्यू, मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात

अहमदनगरमधील मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर, रिक्षा आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

अहमदरनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कंटेरन आणि प्रवासी रिक्षाची जोरदार धडक झाली आहे. यामध्ये मोटारसायकलचा देखील समावेश होता. मोटारसायकल आणि रिक्षातील प्रवासी जखमी झाले तसेच काहींचा मृत्यू झाला आहे. सुरुवातील कंटेनरने मोटारसायकलला कट मारला परंतु समोरुन येणाऱ्या रिक्षावर जाऊन कंटेनर धडकला. कंटेनरची वेगाने धडक बसल्यामुळे रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यामुळे त्या रिक्षात बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन विद्यार्थीनी असल्याचे सांगितले जात आहे. एकूण ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्या ६ जणांवर जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. अॅपे रिक्षासह दोन मोटारसायकल स्वारांचाही अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रिक्षातून एकूण १२ जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तसेच रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे सामान इकडे तिकडे विखुरले होते. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला आहे. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


हेही वाचा : वाझे, परमबीर नंतर पोलिसांतील नवा लेटर बॉम्ब, IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली