घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये घोडा, बैलगाड्यांच्या शर्यती; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये घोडा, बैलगाड्यांच्या शर्यती; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

लॉकडाऊनमध्ये घोडा, बैलगाड्यांच्या शर्यतीचा सराव केला जात असल्याचे समोर आले असून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्य सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंदी आहे. देशभर टाळेबंदी असताना देखील सांगोला तालुक्यात बैलगाड्या आणि घोड्यागाड्यांच्या शर्यतीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. या तालुक्यातील उदनवाडी येथे हा प्रकार उजेडात आला असता संबंधित सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

गेल्या महिन्यात टाळेबंदी असताना देखील त्याची पर्वा न करता सांगोला तालुक्यातील घेरडी येथे बैलगाड्या आणि घोडागाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा दुसरा प्रकार उजेडात आला आहे. एका मोकळ्या शेतात बैल आणि घोड्यांच्या पाच जोड्यांच्या गाड्या आणून तेथे शर्यतीचा सराव केला जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर तेथे पोलिसांनी हस्तक्षेप केला.

- Advertisement -

याप्रकरणी विजय सोपान अलदर (३१), धनाजी तातोबा सरगर (३१), नवनाथ ऋषिधर वलेकर (२१), साईनाथ बापू सरगर (२३), बापूराव चंद्रकांत सरगर (५०) आणि भीमराव देवीदास लवटे ( २२) या सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – वीरगावजवळ जीप-दुचाकी अपघात; तिघे गंभीर जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -