आगीच्या घटनांची जबाबदारी यापुढे रुग्णालय प्रशासनांवर

रुग्णालयात अखंडीत वीजपुरवठा राखण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि पुरवठादार कंपनीची असेल.

Hospital administration is responsible for fire incidents
आगीच्या घटनांची जबाबदारी यापुढे रुग्णालय प्रशासनांवर

कोरोना काळात राज्यातील अनेक रुग्णालयांत आग लागल्याच्या दुर्घटना घडून रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकार रुग्णालयातील आगरोधक उपाययोजना करत आहे. शासकीय रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार न झाल्यास किंवा वेगवेगळ्या विभागात फिरण्याची वेळ येऊन रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यास रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिका-यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचा कठोर निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये रुग्ण दगावल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर असेल.

शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा रुग्णावर वेळेत उपचार होत नसल्याच्या घटना घडतात. मध्यंतरी अशीच एक घटना राज्यातील एका शासकीय रुग्णालयात झाली. छातीत दुखल असल्यामुळे एका शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झालेल्या झालेल्या एका रुग्णावर वेळेवर उपचार झाले नाहीत. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. त्यामुळे रुग्णाचा दुर्देवी मृत्यु झाला. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिका-याच्या चौकशीतून रुग्णालयातील ढिसाळपणा पुढे आला. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याच्या घटनेची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात दाखल होणा-या रुग्णाचा वेळेवर उपचारांअभावी मृत्यु संबंधित वैद्यकीय अधिका-याला निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियमातील तरतुदींच्या आधारे वैद्यकीय अधिका-यावर शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

फायर ऑडीट करणं आवश्यक

रुग्णालयात अखंडीत वीजपुरवठा राखण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि पुरवठादार कंपनीची असेल. उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करेणे, रुग्णालयात मंजूर भारापेक्षा अधिक वीज राहणार नाही याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. विद्युत सुरक्षततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ना हरकत प्रमाणपत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करुन घेणे बंधनकारक केले आहे. सक्षम संस्थेमार्फत रुग्णालयाचे फायर ऑडीट करुन अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.


हेही वाचा : घंटानाद करा अन्यथा कसलाही नाद करा, आमचा नाद करु नका, पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला