घरताज्या घडामोडीधक्कादायक! सावकाराच्या तगाला कंटाळलेल्या कुटुंबाने संपवले आयुष्य

धक्कादायक! सावकाराच्या तगाला कंटाळलेल्या कुटुंबाने संपवले आयुष्य

Subscribe

सावकाराच्या तगाला कंटाळलेल्या कुटुंबातील सर्वांनी आपले आयुष्यच संपवल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील वाढवले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीत अनेकांचे रोजगार देखील बंद झाल्याने अनेक जण आत्महत्या करुन आयुष्य संपवत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे. एका खाजगी सावकाराच्या तगादामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; सोलापूर शहरातील पुणे नाका परिसरात हंडे प्लॉट भागात अमोल जगताप (३५) हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय देखील होता. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मयुरी जगताप (२८), मुलगा आदित्य (७) आणि मुलगी आयुष्य (४) राहत होते. मात्र, एका खाजगी सावकाराच्या तगाला हे कुटुंब प्रचंड कंटाळले होते. अखेर या सर्वांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर? रिकव्हरी रेट ६५ टक्के


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -