मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 2.5 लाखांत घर; फडणवीसांची घोषणा

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना (Slum Holders) केवळ अडीच लाखांमध्ये (2.5 Lakh) घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आली आहे.

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना (Slum Holders) केवळ अडीच लाखांमध्ये (2.5 Lakh) घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेशही काढण्यात आला आहे. (House In 2.5 Lakh To Slum Holders Of Mumbai Big Announcement Of DCM Devendra Fadnavis)

झोपडपट्टीधारकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (DCM Devendra Fadnavis) घोषणेनुसार, 1 जानेवारी 2000 ते 2011 या काळातील झोपडपट्टीधारकांसाठी हा आदेश लागू होणार आहे. त्यामुळे या काळातील झोपडपट्टीधारकांचे मुंबईत (Mumbai) घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडीच्या संदर्भात त्या झोपडीत राहणाऱ्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यासंदर्भात झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती.

2.5 लाखांत घर

गृहनिर्माण विभागाच्या 16 मे 2018 च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार पात्र झोपडपट्टीधारकांना अडीच लाखांत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा आणि मोठा मानला जात आहे.

शिवसेना (ठाकरे गट) प्रतोद सुनील प्रभूंची मागणी

दरम्यान, विधिमंडळाच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याबाबतचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यानंतर आज राज्य सरकारने झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याबाबचा निर्णय जाहीर केला.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या नावाने पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे रॅकेट, बनावट ‘CMO अधिकाऱ्या’चा शिक्षण संस्थांना गंडा