Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?'

‘फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?’

काँग्रेसचा सवाल

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्ग वाढत असताना लसीकरण देखील केलं जात आहे. देशात सधअया ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात असून १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तरुण पुतण्या तन्मयने लस घेतलेल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरुन आथा काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? असा सवा काँग्रेसने केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मयने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लस घेतलेल्याचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. हा फोटो काँग्रेसने शेअर करत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!” असं ट्विट करत काँग्रेसने फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

“तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने फडणवीस आणि भाजपला विचारले आहेत.

शेअर केलेला फोटो केला डिलीट

- Advertisement -

तन्मय फडणवीस याने लस घेतलेल्याचा फोटो डिलीट केला आहे. ज्यावेळी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने हा फोटो डिलीट केला आहे.

कोण आहे तन्मय फडणवीस?

तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘अॅक्टर’ असं लिहिलं होतं, मात्र, आता त्यान हटवलं आहे. इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये ‘पब्लिक फीगर’ असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री देखील होत्या.

 

- Advertisement -