घरताज्या घडामोडीराज्यपाल दौऱ्याला कसे मिळते 'सरकारी' विमान ? जाणून घ्या

राज्यपाल दौऱ्याला कसे मिळते ‘सरकारी’ विमान ? जाणून घ्या

Subscribe

राज्यपालांच्या कार्यक्षेत्रात राज्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमणुकीची मुख्य जबाबदारी असते. भारतीय संविधानातील तरतुदीनुसारच हे अधिकार राज्यपालांना देण्यात आले आहेत. एखाद्या राज्यासाठी राज्यपाल या पदावर काम करताना अनेक नियोजित दौऱ्यांसाठी एक विशिष्ट पद्धतीनेच हे शिस्तबद्ध असे कामकाज पार पडत असते. राज्यपालांना विमान वापरायच असेल तर राजभवनाकडून राज्य सरकारमधील एक महत्वाचा विभाग म्हणजे सामान्य प्रशासन (जीएडी) ला पत्र पाठवावे लागते. जीएडीकडून राजभवनातून आलेल्या पत्राला परवानगी मिळते. त्यानंतरच राज्यपालांना दौरा करणे शक्य होते. गुरूवारच्या राज्यपाल भगतसिंह यांच्या उत्तराखंड दौऱ्यातील देहरादून प्रवासाबाबतही राजभवनातून जीएडीला एक पत्र पाठविण्यात आले होते. तसेच उत्तराखंड दौऱ्याचा संपुर्ण कार्यक्रमही जीएडीला देण्यात आला होता. राज्याच्या मुख्य सचिवांनाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडेही या नियोजित उत्तराखंड दौऱ्याची फाईल पोहचली होती. पण राज्यपाल हे विशेष अशा सरकारी चार्टर्ड फ्लाईटमध्ये बसेपर्यंत राज्य सरकारकडून या दौऱ्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.

विमानातून राज्यपालांना उतराव लागणे हा पोरखेळ – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणुक मिळणे हे कधी घडल नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. राज्यपाल पदावर व्यक्ती येतात अन् जातातही. पण महत्वाच म्हणजे राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. जाणीवपूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळेच राज्यपालांना विमानातून उतराव लागणे हा पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इतक अहंकारी सरकार मी आतापर्यंत पाहिलेल नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार आणणे हे चुकीच असल्याचे ते म्हणाले. सरकार ही आपली मालमत्ता असल्यासारखे राज्य सरकार वागत आहे. महाराष्ट्रात हा पोरखेळ सुरू असून अशा पद्धतीचे सरकार मी पाहिलेल नाही असेही ते म्हणाले. रस्त्यावरची भांडणे असल्यासारखे राज्य सरकार वागत आहे. राज्यपालांपेक्षा संपुर्ण राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनता सज्ञान आहे, त्यामुळे सरकारला याच उत्तर लवकरच मिळेल असे ते म्हणाले. आजच्या प्रकाराच्या निमित्ताने राज्य सरकार किती अहंकारी आहे हेदेखील सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -