घरमहाराष्ट्रबाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत मांडीला मांडी लावून कसे बसता?, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत मांडीला मांडी लावून कसे बसता?, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

बाळासाहेबांना अटक केल्यानंतर याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या सुभाष साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं, याचा हवालाही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे

मुंबईः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

विशेष म्हणजे त्यांचा व्हिडीओ एकनाथ शिंदेंनी ट्विटवरून ट्विट करत उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. बाळासाहेबांना अटक केल्यानंतर याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या सुभाष साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं, याचा हवालाही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झालेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला.

- Advertisement -

पंढरपूरची पोटनिवडणूक लागली त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात अली, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश श्रीरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली. एकनाथ शिंदे यांचं हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे, त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं, अशी मागणी सुभाष साबणे यांनी केली आहे.

तत्पूर्वी ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी टि्वट करत शिवसैनिकांना मविआचा खेळ ओळखण्याचे आवाहन केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरींमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदे यांच्याकडे 40 हून अधिक आमदार असल्याने ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार हे निश्चित आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निवासस्थान सोडून मातोश्रीत परतले आहेत. त्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांसह शिवसैनिकांनाही भावनिक आवाहन केले. त्यानंतर भावूक झालेल्या शिवसैनिकांनीही शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हा सर्व गोंधळ एकीकडे सुरू असतानाच शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव यापुढे शिवसेना बाळासाहेब असेल असे जाहीर केले. त्यावरून वातावरण अधिकच पेटले असून, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद रंगला आहे. बाळासाहेबांचे नाव वापरून वेगळा गट निर्माण करण्याचा शिंदेगटाच्या निर्णयाला महाराष्ट्रातून विरोध होत आहे. यातूनच आज ठाणे, रायगड, पालघर, कोल्हापूर यासह विविध जिल्ह्यांमध्ये संतप्त शिवसैनिकांनी बंडखोरांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोडही केली. पुतळेही जाळले. यात शिंदे यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला.


हेही वाचाः प्रिय शिवसैनिकांनो नीट समजून घ्या.मविआचा खेळ ओळखा–एकनाथ शिंदे यांचे टि्वट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -