Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज्यात यापुढे एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असा विश्वास जनतेला दिला होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात हजारो आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. आताच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात (1 जुलै 2022 ते 30 ऑक्टोबर 2023) पर्यंत राज्यातील तब्बल 3 हजार 727 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या 30 महिन्यांच्या काळात 6 हजार 969 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत आणि पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. (How many farmers committed suicide during Chief Minister Eknath Shinde s tenure Statistics came forward)
नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत आहे. भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली. खतांच्या वाढलेल्या किंमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न, घसरलेल्या ‘सीबील’मुळे बँका कर्ज देत नाहीत, कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडली जात आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातला शेतकरी खचला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतली. त्यानंतर 30 जून 2022 पर्यंत त्यांनी राज्याचा कारभार पाहिला. महाविकास आघाडी सरकार सत्तेर असताना 30 महिन्यांत ( 1 डिसेंबर 2019 ते 30 जून 2022) या काळात जवळपास सात हजार आणि विद्यमान सरकारच्या 15 महिन्यांच्या काळात जवळपास पावणेचार हजार शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
महाविकासच्या अडीच वर्षांची स्थिती
1 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020- 2 हजार 789
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2022- 4 हजार 180
एकूण शेतकरी आत्महत्या- 6 हजार 969
शिंदे सरकारच्या 15 महिन्यांतील स्थिती
1 जुलै ते 31 डिसेंबर 2022- 1 हजार 452
1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर-2 हजार 292
एकूण शेतकरी आत्महत्या- 3 हाजर 744
(हेही वाचा: सरकारने वेगाने आरक्षणाचं काम करावं,ओबीसीतूनच आरक्षण द्यावं; जरांगे पाटील मागणीवर ठाम )