घरमहाराष्ट्ररेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची कन्फर्म लोअर बर्थ कशी बुक कराल? रेल्वेने सांगितली...

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची कन्फर्म लोअर बर्थ कशी बुक कराल? रेल्वेने सांगितली पद्धत

Subscribe

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) अलीकडेच रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी कन्फर्म लोअर बर्थ बुक करण्यासाठी एक विषेश पद्धत सांगितली आहे. कारण भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ बुक करणाच्या तरतुदी असूनही अनेकदा त्यांना लोअर वर्थचे आरक्षण करता येत नाही. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा समान करावा लागतो. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक नवी पद्धत सांगितली आहे.

अलीकडेच एका भारतीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांना ट्विट केले होते. यामध्ये ट्विटमध्ये त्याने म्हटले की, सीट वाटप करताना रेल्वे कोणता तर्क लावते? मी लोअर बर्थला प्राधान्य देऊन ३ ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटे बुक केली होती, तेथे १०२ लोअर बर्थ उपलब्ध आहेत. तरीही वाटप केलेले बर्थ मध्यम, वरचे आणि बाजूचे खालचे आहेत. तुम्हाला ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

रेल्वेने नियम सांगितले

यावर ट्वीटवर उत्तर देताना भारतीय रेल्वेने म्हटले की, “सर, लोअर बर्थ/ ज्येष्ठ नागरिक कोटा (सीनियर सिटीजन लोअर बर्थ )आहेत जे फक्त ६० वर्षांच्या पुरुषांसाठी आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आहे. एकटे प्रवास करताना किंवा दोन प्रवासी (एकाच तिकिटावर प्रवास करण्याच्या नियमांनुसार). फॉलो-अप ट्विटमध्ये, अधिकाऱ्याने पुढे ट्वीट केले की, जर दोनपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटा ज्येष्ठ नागरिकासह इतर प्रवासी ज्येष्ठ नागरिक नसतील, तर यंत्रणा त्याचा विचार करणार नाही.” म्हणजेच काय लोअर बर्थ सीट अशा प्रवाशांना मिळत नाही.

या सिस्टमअंतर्गत, एका पीएनआर क्रमांकावरून फक्त दोन सीट कोटा मिळवता येतो. त्यामुळे जर एकच PNR क्रमांकावरुन दोन पेक्षा जास्त प्रवासी असतील, तर लोअर बर्थ सीट कन्फर्म करण्यासाठी ही कोटा सिस्टम लागू होतनाही.

- Advertisement -

अशी करा कन्फर्म लोअर बर्थ सीट ?

तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ सीट कन्फर्म करू शकता. यासाठी जेव्हा तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर तिकीट बुक करता, तेव्हा सुरुवातीला सर्व डिटेल्स भरल्यानंतर, जनरल कोटा सिलेक्ट करा. त्यानंतर ट्रेन आणि वर्ग निवडा.

यानंतर स्क्रीनवर एक बॉक्स ओपन होईल. जिथे प्रवाशांची डिटेल्स भरावी लागेल. या नंतर सिनियर सिटीजनवर क्लिक करा. पेमेंट करण्यापूर्वी ‘अवेलेबिलिटी इन सीनियर सिटीजन कोटा’ या लोअर बर्थ कोटा वर क्लिक करा. यावर जर दोन जागांची उपलब्धता दाखवत असतील तर त्यावर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करुन आपले तिकीट बुक करा मात्र कोरोनामुळे तुम्हाला अनेक ट्रेनमध्ये ही सुविधा मिळणार नाही.


Thalaivii : जयललिता असत्या तर कंगनाला नव्हे ऐश्वर्याला मिळाला असता बायोपिकमध्ये रोल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -