WhatsApp Chatbot : मुंबई महापालिकेची व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा कशी वापराल ? जाणून घ्या

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज (शुक्रवार)मुंबई महापालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या या सुविधेमध्ये ८० पेक्षा अधिक सुविधांची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्याआधी सेवा सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअॅपद्वारे 8999-22-8999 या नंबरवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.

या सुविधेचा कसा कराल वापर ?

मुंबई महापालिकेकडून व्हॉट्सअॅप चॅटबॉट ही सेवा जारी करण्यात आली आहे. ही व्हॉट्सअॅपशी निगडीत असणार आहे. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचं अॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेकडून 8999-22-8999 हा नंबर देण्यात आला आहे. या नंबर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या सुविधेमध्ये ८० पेक्षा अधिक सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करायच्या असतील किंवा अर्ज भरायचे असतील तर ते अर्ज सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून भरता येणार आहे.

ही सेवा नेमकी कशी काम करते?

तुमच्या मोबाईलमध्ये 8999-22-8999 हा नंबर प्रथम सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्ही हाय किंवा संवाद साधण्यास सुरूवात केल्यानंतर तुम्हाला मुंबई महापालिकेतर्फे लगेच प्रतिसाद मिळेल. तसेच भाषा निवडीसाठी एक पर्याय येतो. हा पर्याय निवडल्यानंतर मुख्य सूची आपल्या स्क्रीनवर दिसते. यामध्ये कोविड-१९ नियंत्रण कक्ष, लसीकरण समर्थन, इतर पर्याय, सतत विचारले जाणारे प्रश्न अशा प्रकारचे पर्याय तुमच्या पुढील प्रकियेनुसार दिले जातात.

जर तुम्ही सूचीनुसार कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विभागासंदर्भातील माहिती दिली जाते. या अॅपच्या माध्यमातून मुंबई महापालिकेकडून उत्तम सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधित माहिती तुम्हाला या अॅपद्वारे मिळू शकते.

जगण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी…

दरम्यान, कोणत्याही सरकारसाठी जीवन सुलभता हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहीजे. या उपक्रमामुळे ते आघाडीवर आहे. जगण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता आमच्याकडे मॉडेल आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील इतर शहरे आणि जिल्ह्यांची माहिती घेऊ शकणार आहोत, असं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : UP Elections 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी झाली मोठी गर्दी, २५०० सपा कार्यकर्त्यांवर FIR दाखल