सातारा : नागरिकांचे दुखणे कमी करण्याऐवजी ते कसे वाढेल, याकडे लक्ष आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सराकारव टीका केली आहे. शरद पवारांनी साताऱ्याच्या दहिवडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कांद्यावर निर्यात शुल्क, राज्य सरकार आणि मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात काही लोक बदल करू पाहत आहेत. या बदलाचा परिणाम राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांच्या मार्फत केला जात आहे. राज्यातील नागरिकांचे दुखणे कमी करण्याऐवजी ते वाढतील कसे, त्याकडे लक्ष आहे. सत्तेचा वापर हा पक्ष फोडण्यासाठी केला जात. अनेक पक्ष फोडली, माणसामाणसात अंतर वाढविले. पक्ष फोडून या देशाच एक वेगळे चित्र कसे तयार होईल, याची खबरदारी ही केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्या लोकांडून घेतली जाते. म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की, फाटाफूट करण्याचा जे प्रयत्न करतात. पक्ष फोडून लोकांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यासर्वांच्याविरोधात एकजुटीने शक्तीने आपण उभे राहिले पाहिजे. आपण आपली सामुदायिक ताकत उभी केली. ही आपण उभी केली. तर कोणी काही केले, देशामध्ये फाटाफुटीचे राजकारण करो, माणसांमध्ये अंतर वाढो, त्यासर्वांना धडा शिकविण्याची ताकत, महाराष्ट्रासारख्या कष्टकरी लोकांचे आणि तरुण पिढीकडे आहे. यांची पूर्ण खात्री तुम्हाला आणि मला आहे.”
हेही वाचा – शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही – शरद पवार
पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नाही
मणिपूर हिंसाचारावर बोलताना शरद पवार म्हणाले, “मणिपूरमध्ये 2 महिलांची निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली. मणिपूर हिंसाचार प्रकरणी संसदेत विनंती केली की, मणिपूरमध्ये जाऊन तेथील परिस्थिती शांत करण्याची जबाबदारी ही देशाच्या नेतृत्वाची आहे. पण पंतप्रधान हे मणिपूरमध्ये गेले नाही. अजूनही केंद्र सरकारने मणिपूरमध्ये ढुंकून ही बघितले नाही”, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधानांवर केली.
हेही वाचा – शरद पवारांचे ‘त्या’ वक्तव्यावरून घुमजाव, म्हणाले – “मी असे…”
चीनच्या शेजारी असलेल्या राज्यांचे रक्षण करणे गरजेचे
चीनच्या घुसखोरीसंदर्भात शरद पवार महणाले, “भारताने चीनच्या शेजारी असलेल्या राज्यांचे रक्षण केले पाहिजे. यासाठी केंद्राची सत्ता, शक्ती आणि बळ वापरण्याची गरज आहे. पण आजचे केंद्र सरकार हे चीनच्या प्रश्नाकडे बघत देखील नाही. यामुळे देशात एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे आणि देशातील हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला काही ना काही निर्णय द्यावा लागेल. तसेच पुढचा काळात एकजुटीने शक्ती उभी करण्याचा आहे.”