घरताज्या घडामोडीHSC Board Result 2021: मंगळवारी दुपारी १२वीचा निकाल होणार जाहीर

HSC Board Result 2021: मंगळवारी दुपारी १२वीचा निकाल होणार जाहीर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा (HSC Result 2021) १२वीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत शक्यता वर्तवली जात होती. काल, रविवारी १२वीचा निकाल सोमवारी लागणार असल्याचे समोर आले होते. पण असे काही झाले नाही. अखेर १२वीच्या निकालाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी १२वीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जुलैच्या अखेरस लागण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्याने बारावी निकाल जाहीर करण्यास ऑगस्ट महिना उजाडला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्यात आलेला १२वीचा निकाल उद्या ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. यामुळे वर्षा गायकवाड यांनी सर्व १२वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

वर्षा गायकवाड ट्वीट करून म्हणाल्या की, ‘सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत १२वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून त्यात शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते.’

- Advertisement -

इयत्ता १०वीप्रमाणे १२वीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. आता १२वीचा निकाल दहावी, ११वी आणि १२वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर आधारित असणार आहे. यामध्ये १०वी, ११वीसाठी प्रत्येकी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

असा मिळवा परीक्षा क्रमांक? 

सर्वप्रथम http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जायचे.
त्यानंतर तिथे तुमचा जिल्हा आणि तालुका टाकायचा.
मग तुमचे संपूर्ण नाव टाकायचे. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर उपलब्ध होईल.

निकाल कुठे पाहाल?

msbshse.co.in
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -