Hsc Exam 2023 : परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी; कॉपी आढळल्यास कारवाई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होत आहे. राज्यातील दहा हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून तीन हजार १९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे.