घरमहाराष्ट्रHSC Exam 2024 : बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार उघडकीस; वाचा सविस्तर

HSC Exam 2024 : बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार उघडकीस; वाचा सविस्तर

Subscribe

यंदा बीडमध्ये 102 केंद्रावर 41 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असताना सुद्धा बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बीडच्या तेलगाव येथे सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमाकि विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा दुसऱ्या मजल्यावर काही तरुण खिडकीच्या छतावर चढून कॉपी पुरविल्याचा प्रकार घडला आहे. कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी जिल्हा प्रशासन हालचाली करत आहे तर, दुसऱ्या बाजूला कॉपी पुरवण्यासाठी तरुण करत असल्याचे दिसून आहे. या कॉपी प्रकरणावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dispute In Maratha Reservation : मराठा आंदोलनात मोठी फूट; बारसकरांचे जरांगेंवर गंभीर आरोप

परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची 100 टक्के झडती घेण्याचे निर्देश असून यासाठी परीक्षा केंद्रावर महसूल विभागाची पथकांची देखील नियुक्त करण्यात आली आहे. बीडमध्ये 102 केंद्रावर 41 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar on Ajit Pawar : येणाऱ्या काळात अजित पवार एकटेच पडतील; रोहित पवार का म्हणाले असं…

इंग्रजी, विज्ञान, विषयाच्या परीक्षेवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदे आणि पोलीस अधीक्षक, सीईओ हे अचानक भेटी देत असून सहा भरारी पथके नियुक्ती करण्यात आली आहेत. सर्व भरारी पथके भेट देणार असून देखील परीक्षण केंद्र ते मुख्य परीक्षा केंद्र यादरम्यान प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण करून परीक्षकांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -