Homeमहाराष्ट्रHSC Exam Hall Ticket : 12 वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध,...

HSC Exam Hall Ticket : 12 वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध, असे मिळवा प्रवेशपत्र

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. याकरिता महिनाभर आधीच शिक्षण मंडळाकडून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. याकरिता महिनाभर आधीच शिक्षण मंडळाकडून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन हे प्रवेशपत्र काढता येणार आहे. याबाबतची माहिती सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बारावीचे हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. (HSC Exam Hall Ticket Available Online)

बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बारावीची प्रवेशपत्र सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. तर, परीक्षेच्या ज्या अर्जांना “पेड” असे स्टेटस असेल त्यांचीच प्रवेशपत्रे “पेड स्टेटस अ‍ॅडमिट कार्ड” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या आणि एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “एक्स्ट्रा सीट नंबर अ‍ॅडमिट कार्ड” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.

- Advertisement -

हेही वाचा… Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहाच, कारण…

महत्त्वाची बाब म्हणजे, डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव किंवा आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास त्या दुरूस्त्या ऑनलाइन पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता अ‍ॅप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. पण या दुरुस्त्यांकरिता विभागीय मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर दुरुस्त झालेले प्रवेशपत्र अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना “पेड” असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होवून “लेट पेड स्टेट अ‍ॅडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

- Advertisement -

तसेच, जर का एखाद्या विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. तर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, अशा सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -