Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी HSC Exam 2023 : १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून हॉल तिकीट उपलब्ध

HSC Exam 2023 : १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून हॉल तिकीट उपलब्ध

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२३ परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून (२७ जानेवारी २०२३) उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२३ परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून (२७ जानेवारी २०२३) उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे. बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा या 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. याबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माहिती देण्यात आली. (HSC Hall Ticket 2023 12th Exam Hall Ticket Available)

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हॉल तिकीट प्रिंट

  • फेब्रुवारी-मार्च २०२३साठी १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये.
  • या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

चुका किंवा बदल असल्यास काय कराल?

  • हॉल तिकीटमध्ये काही चुक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या.
  • हॉल तिकीटवरचा फोटो, सही, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातल्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे ताबडतोब पाठवायची.
- Advertisement -

हॉल तिकीट हरवल्यास काय कराल?

  • हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून हरवले तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा.
  • फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सही शिक्का मारावा.

हेही वाचा – मालाडमधील ‘त्या’ उद्यानाचे नाव बदलले, शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दे धक्का

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -