घरमहाराष्ट्रHSC Result 2021 : मुंबईच्या पोरांचा 'क्लास'च भारी, राज्यात ६ लाख विद्यार्थ्यांना...

HSC Result 2021 : मुंबईच्या पोरांचा ‘क्लास’च भारी, राज्यात ६ लाख विद्यार्थ्यांना ‘फर्स्ट क्लास’

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. कोरोनामुळे यंदा १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र यंदा १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी राज्याभरातील जवळपास १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ४७८९ विद्यार्थी अनुर्त्तीण झाले आहेत. यात यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९९.५५ टक्के, कला ९९.८३ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९. ९१ टक्के लागला आहे.

मुंबईची पोरं हुशार…

विशेष म्हणजे यंदा १२ वीच्या निकालात तब्बल ६ लाख ८८ हजार ७३० विद्यार्थी फस्ट क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे या विद्यार्थ्यांना १२ वीच्या अंतिम परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत. यात मुंबईत फस्ट क्लासने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत १ लाख ३४ हजार ६७५ विद्यार्थी फस्ट क्लासने पास झाले आहेत. त्याखालोखाल पुणे, औरंगाबादचा क्रमांक लागतो. पुण्यात १ लाख १४ हजार ६६ विद्यार्थी तर औरंगाबादमध्ये १ लाख ११ हजार २२५ विद्यार्थी फस्ट क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय अमरावती, नाशिक, नागपूरमध्ये ८० ते ६५ हजारांच्या संख्येने विद्यार्थी फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. मात्र प्रत्येक बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कोकणात मात्र फस्ट क्लासने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे.

- Advertisement -

६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मुंबई, पुण्यात सर्वाधिक 

याखालोखाल १२ वीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख २३ हजार ९६२ इतकी आहे. या टक्केवारीतही मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत जवळपास १ हजार २७ हजार २५६ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर पुणे, कोल्हापूर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यात ९५ हजार ९११ विद्यार्थी तर नाशिकमध्ये ७३ हजार ४८५ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक टक्के मिळाले आहेत. यानंतर ४५ टक्के गुणांनी तब्बल ९१ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईत ३०५७४ , कोल्हापूरात १८४८५, पुण्यामध्ये २०१३६ तर नागपूरात १०५५० विद्यार्थ्यांना ४५ टक्के मिळाले आहेत. यातच १२ वीत ३५ टक्क्यांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ६३८ इतकी आहे. यात मुंबई, पुण्यात अनुक्रमे ९७१, ६५० विद्यार्थ्यांना ३५ टक्के मिळाले आहेत.

यंदा १२ वीच्या निकालात कोकण विभागानेच बाजी मारली आहे. यंदा कोकणाचा निकाल ९९.८१ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबादचा निकाल ९९. ३४ टक्के लागला आहे.

- Advertisement -

उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण

पुणे ९९.७५, नागपूर ९९. ६२, औरंगाबाद ९९.३४, मुंबई ९९. ७९. कोल्हापूर ९९.६७, अमरावती ९९.३७, नाशिक ९९.६१, लातूर ९९.६५, कोकण ९९.८१ टक्के इतके आहे.


 

 

 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -