घरताज्या घडामोडीHSC Result 2021: यंदाही मुलींचीच बाजी, १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के

HSC Result 2021: यंदाही मुलींचीच बाजी, १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता यंदा १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा एकूण निकाल ९९. ६३ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल यंदा ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. याशिवाय उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९८. ८० टक्के लागल्याची माहिती दिनकर पाटील यांना दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २. ५२ टक्क्यांनी वाढला आहे.

मुलींचीच बाजी 

१२ वीत यावर्षी ७०७५१८ विद्यार्थी तर ६०७४४७ विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७४ टक्के आहे तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे. त्यामुळे यंदाही १२ वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

- Advertisement -

बारावी निकालाची ठळक वैशिष्ट्ये

यंदाच्या बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातून आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळाधून विज्ञान, कला,वाणिज्य आणि एचएससी व्होकेशनल या शाखेतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी उत्तर्णी झाले असून त्यांची निकालाची टक्केवारी ९९.६४ इतकी आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांकडून सर्व शाखांतून एकूण ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी (Re-examinee) नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे. ६६ हजार ८७१ पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकलाची टक्केवारी ९४.३१ इतकी आहे.

- Advertisement -

यंदाच्या बारावीचा निकलात देखील कोकणाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा बारावीचा निकाल ९९.८१ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबादमध्ये बारावीचा निकाल ९९.३४ टक्के इतका लागला आहे.

दिव्यांग विद्यार्थांच्या बारावीचा निकाल ९९.५९ टक्के लागला आहे.

एकूण १६० विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीत निश्चित केलेल्या भारांशानुसार गुण देण्यात आले आहेत. त्यातील ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २६ हजार ३३२ इतकी आहे. त्यांच्या निकाल ९९.४४ टक्के इतका लागला आहे.

कुठे तपासाल निकाल ?

 

१२ वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील लिंकच्या माध्यमातून पाहता येईल.

१) https://hscresult.11thadmission.org.in,

२) https://msbshse.co.in,

३) hscresult.mkcl.org,

४) mahresult.nic.in

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -