ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ चा इयत्ता बारावीचा (HSC Result 2022) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

Results of 10th and 12th supplementary examinations today

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ चा इयत्ता बारावीचा (HSC Result 2022) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्हाचा (Thane District) निकाल ९२.६७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. (hsc result 2022 of Thane district is 92.67 percent)

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हात ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण

यंदा ठाणे जिल्ह्यातील ९५४२० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५० हजार ४७७ मुले प्रविष्ट झाले होते त्यापैकी ४६२९६ मुले उत्तीर्ण झाले. तर ४४९४३ मुली प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी ४२१३५ मुली उत्तीर्ण झाल्या. अशाप्रकारे मुलांचा ९१.७१ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.७५ टक्के लागला आहे.

हेही वाचा – यंदाही १२ वीच्या निकालात मुलीच अव्वल; ९५.३५ टक्के मुली उतीर्ण

ठाणे जिल्हात कल्याण ग्रामीण क्षेत्र अव्वल

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये कल्याण ग्रामीण क्षेत्रातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

कोकण विभाग टॉपवर तर औरंगाबाद सर्वात कमी

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (90.91 टक्के) आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण – 97.22 टक्के
  • पुणे – 93.61 टक्के
  • कोल्हापूर – 95.07 टक्के
  • अमरावती – 96.34 टक्के
  • नागपूर – 96.52 टक्के
  • लातूर – 95. 25 टक्के
  • मुंबई – 90.91 टक्के
  • नाशिक – 95.03 टक्के
  • औरंगाबाद – 94.97 टक्के

हेही वाचा – औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्र्यांसह मंचावर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य