घरमहाराष्ट्रआज बारावीचा निकाल, दोनच महिन्यात पुनर्परीक्षेचीही संधी!

आज बारावीचा निकाल, दोनच महिन्यात पुनर्परीक्षेचीही संधी!

Subscribe

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आज बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. ११ वाजता निकाल जाहीर होणार असून तो दुपारी १ वाजल्यापासून mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी जास्त वेळ न दवडता बारावीचा निकाल लावण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत निकाल लागेल, असे संकेत महाराष्ट्र मंडळाने दिले होते. त्याप्रमाणे आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

१४ लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात विज्ञान शाखेचे ५ लाख ८० हजार ८२० विद्यार्थी, कला शाखेचे ४ लाख ७९ हजार ८६३ विद्यार्थी, कॉमर्सचे ३ लाख ६६ हजार ७५६ विद्यार्थी बसले आहेत. व्होकेशनलसाठी ५७ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यातील ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालये आणि २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

- Advertisement -

कसा पाहता येईल ऑनलाईन निकाल?

१. mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या

- Advertisement -

२. रकान्यात तुमचा परीक्षा क्रमांक भरा. त्याखालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे भरा

३. निकालाची विंडो ओपन होईल. या निकालाची प्रिंट आऊटदेखील काढू शकता.

निकालासाठी अन्य वेबसाईट

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams

पुन्हा मिळणार संधी!


श्रेणी किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत नापास आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. ही पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट आणि फेब्रुवारी-मार्च २०१९ अशी असेल. नापास आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होईल. निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या अर्ज करता येईल, तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावे लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -