घरताज्या घडामोडीMosque Blast in Peshawar : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला, नमाजावेळी झालेल्या स्फोटात...

Mosque Blast in Peshawar : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला, नमाजावेळी झालेल्या स्फोटात ३६ जणांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानच्या पेशावर शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मस्जिदमध्ये झालेल्या स्फोटामध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा जास्त लोकं गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. शुक्रवार जुम्माची नमाज पठण करण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी दहशतवाद्याने गर्दीमध्ये जाऊन बॉम्बने स्वतःसह उडवून घेतलं आहे. या स्फोटामध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमधील पेशावर शहरात असलेल्या मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एका पोसिसाचाही मृत्यू झाला आहे. मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच मृतदेह लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, ३० मृतदेह रुग्णालयात आणले आहेत. पाकिस्तानमध्ये आपूर्वी अनेक हल्ले झाले आहेत. परंतु हा हल्ला भीषण असून संपूर्ण पाकिस्तान हादरलं आहे. हल्ला करण्यामागील सूत्रधार कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही.

- Advertisement -

दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानमधील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचण्यापूर्वी घटनास्थळी उपस्थित असेल्या लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

पेशावरमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पुरावे शोधणे आणि तपास सुरु करण्यात आला आहे. कोणत्या संघटनेकडून हल्ला करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : बिहारच्या भागलपूरमधील तीन मजली इमारतीत भीषण स्फोट; 8 ठार, 8 जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -