घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, माजी आमदार करणार...

Uddhav Thackeray : कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

रत्नागिरी : शिवसेनेमध्ये पडलेल्या फुट पडल्यानंतर कोकणातील शिवसैनिक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम होते. मात्र अनेक नेते शिंदे गटात गेले. त्यामुळे आता कोकणावर उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेच्या अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः दौरा करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ते आता 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर आहेत.

कोकण दौऱ्याआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 2014 साली विधानसभा निवडणुकीत पक्षातल्याच लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे सूर्यकांत दळवी नाराज झाले.

- Advertisement -

हेही वाचा… Rashmika Mandanna : …म्हणून ‘त्या’ व्हिडीओविरोधात आवाज उठवला, रश्मिकाकडून खुलासा

रामदास कदम यांनी 2014 च्या निवडणुकीत पक्षाविरूद्ध गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला होता. 2019 पासून माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज होते. शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर सूर्यकांत दळवी यांना मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा होती. मात्र दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे पुन्हा दळवी यांच्या नाराजीत भर पडली.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमात दिसस नव्हते. सूर्यकांत दळवी 1 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम हे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात, त्यामुळे सूर्यकांत दळवी यांच्या भाजप प्रवेशानंतर ते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी कसं जुळवून घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा… Uddhav Thackeray : मोदींची महाराजांशी तुलना करणारे निर्बुद्ध, गोविंदगिरी महाराजांना उद्धव ठाकरेंनी सुनावले

पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून 1990 साली मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी साडून सूर्यकांत दळवी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दाखल झाले होते. कोणताही राजकयी अनुभव नसताना देखील सूर्यकांत दळवी यांनी पहिल्याच प्रयत्नात 1990 साली आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर सलग 25 वर्ष सूर्यकांत दळवी यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -