घरताज्या घडामोडी'चिरभोग' लघुपटाला मानवाधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

‘चिरभोग’ लघुपटाला मानवाधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Subscribe

राष्ट्रीय मानवअधिकार आयोगाने आयोजित केलेल्या ८ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत निलेश आंबेडकर यांच्या चिरभोग या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळयात हा पुरस्कार लघुपटाचे दिग्दर्शक यांना दिला जाणार आहे.

या लघुपटाची निर्मिती राहुल सोनावणे आणि निलेश आंबेडकर यांनी केली आहे. चीरभोग एका मुलाचे समाजात जातीनिहाय व्यवसायावर आधारित सतत भेदभाव, हक्क सुनिश्चित करण्यासाठी सिद्धांत आणि व्यवहारातील विरोधाभास उघड करणारा आणि त्या मुलाच्या अपमानास्पद संघर्षांवर प्रकाश टाकतो.

- Advertisement -

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष श्री. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण आयोगाने, सदस्य डॉ. ज्ञानेश्वर एम. मुळे आणि श्री. राजीव जैन यांचा समावेश करून पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली.

चिरभोग या लघुपटाची कथा निलेश आंबेडकर यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद संजय भारतीय यांनी लिहिले आहेत. राजवीर परदेशी, सुकेशिनी कांबळे, सुशीलकुमार शिर्के, सोपान भोईर, राहुल बनसोडे, सचिन धारणकर आणि राहुल सोनवणे यांनी यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. विनायक जंगम आणि रोहित गायकवाड यांचे छायाचित्रण, मयूर सातपुते यांचे संकलन, शशिकांत कांबळी यांचे संगीत, श्वेता सवाई यांचे वेशभूषा, श्रद्धा जगदाळे यांचे उपशीर्षक आणि संदीप रायकर यांचे मेकअप या लघुपटासाठी केला आहे.

- Advertisement -

गीत ज्ञानेश्वरी जमदाडे यांनी गायिले आहे. सोबतच दिलीप आहेर, सचिन धारणकर, सोपान भोईर, संघमित्रा सोनवणे, तक्षशिला सोनवणे यांचे या लघुपटासाठी विशेष सहकार्य मिळाले आहे. परंतु या वर्षी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


हेही वाचा : तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -